माघी यात्रेनिमित्त पोलीस यंत्रणा सज्ज

1 हजार 394 पोलीस अधिकारी व कर्मचारी, एक आरसीएफ तुकडी

माघी यात्रेनिमित्त पोलीस यंत्रणा सज्ज

माघी यात्रेनिमित्त पोलीस यंत्रणा सज्ज

 उपविभागीय पोलीस अधिकारी-डॉ.अर्जुन भोसले   

   1 हजार 394 पोलीस अधिकारी व कर्मचारी, एक आरसीएफ तुकडी , 162 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे 

  पंढरपूर दि.18:- माघी यात्रे निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात. दि.20 फेब्रुवारी 2024 रोजी जया एकदशी असून, माघी यात्रा कालावधी 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. या कालावधीत पंढरपूरात येणाऱ्या भाविकांच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षितपणे पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जून भोसले यांनी दिली.

 वारी कालावधीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतुक नियत्रंणासाठी 1 हजार 394 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये 01 उपविभागीय पोलीस अधिकारी, 10 पोलीस निरिक्षिक, 55 सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक, 10 महिला सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक 618 पोलीस कर्मचारी व 700 होमगार्ड तसेच एक जलद प्रतिसाद पथक, एक आरसीएफ तुकडी व दोन बीडीडीएस पथके नियुक्त करण्यात आले आहेत. वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदीपात्र, 65 एकर, महाव्दार चौक, महाव्दार घाट, पत्राशेड व नामदेव पायरी या सहा ठिकाणी वॉच टॉवर करण्यात आले आहेत. तसेच नदीपात्रासह, प्रदक्षिणा मार्ग, मंदीर परिसर, स्टेशन रोड आदी ठिकाणी 162 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याचेही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.   वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये भाविकांना वाहुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशापांडे यांच्या आदेशान्वये जड वाहतुक शहराबाहेरुन वळविण्यात आली आहे . तसेच वाहतुक नियमनासाठी डायव्हरशन पॉईट व नाकाबंदी पाँईंट सुरु करण्यात आले आहे. त्याचबरोबर खाजगी वाहनधारकांच्या वाहनांना थांबण्यासाठी शहरात तसेच शहराबाहेर वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे.भाविकांनी व नागरिकांनी सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनास सहाकार्य करावे असे, आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.भोसले यांनी केले आहे.